- राज्य सरकारकडून नवरात्रीचा मुहूर्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. ७ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळेच प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.