- अजित पवारांकडून तीन सदस्यीय प्रभाग पद्धत बदलण्याचे संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी आज अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले असता पवारांनी ‘मुंबई वगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणा-या मंत्री मंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का निर्णय कळेल, असे सूचक वक्तव्य केले.
‘थोडे थांबा’ असे सूचक वक्तव्य केल्याने राज्य सरकारने यापूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पवार म्हणाले,” काही वाद होणार नाही. आमच्या सहकारी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. ती त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून समंजसाने मार्ग काढू. येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा पक्की माहिती मिळेल. वॉडे रचनेबाबत कोणताही वाद होणार नाही. ज्यांना न्यायालयालयात जायचे ते जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.