न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- भोसरीतील यअण्णासाहेब मगर बँकची २२ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ही सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीची सभा बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस उपाध्यक्ष मनोज बोरसे, संचालक अॅड. घनशाम खलाटे, श्रीमती सुलोचना भोवरे, गणेश पवळे, विजय गवारे, सविता मोहल्त, सोनल लांडगे, दिपक डोळस, अॅड. बाळासाहेब थोपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. सभेचे अध्यक्षपद प्रा. राजेश सस्ते यांनी स्विकारले.
प्रथमतः स्व. खा. अण्णासाहेब मगर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण केली. यानंतर सभेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. बँकचे व सभेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी बँकेच्या वर्षातील कामकाजाची माहिती आपल्या मनोगताद्वारे सभासदांना दिली. विषयपत्रिकेतील सर्व विषय सर्वानुमते मंजुर झाले. प्रा. राजेश सस्ते यांनी सभासदांचे आभार आणि उपाध्यक्ष मनोज बोरसे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.