- तब्बल नऊ गुन्ह्यांचा तपासात उलगडा; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- एटीएम फोडणारे दोन गुन्हेगार थेरगावातील आदित्य बिर्ला हॉस्पीटल येथे येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक केली.
आरोपींनी यु-टयुबवरील व्हिडीओ पाहून त्याद्वारे एटीएम फोडले. या दोन आरोपींवरील तब्बल नऊ गुन्ह्यांचा उलगडा तपासात करण्यात आला आहे. महादेव प्रकाश तिर्थे (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळगाव- लातुर) आणि निशांत ज्ञानेश्वर गुळुंजकर (वय २४, रा. चिंतामणी चौक, चिंचवड) असे अटक आरोपींची नावे आहेत.














