- माजी नगरसेवकांना करणार मार्गदर्शन..
- आ. बनसोडे यांच्या कार्यालयात दौऱ्याबाबत आढावा बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात येत्या १३ ऑक्टोबर रोजी माजी नगरसेवकांच्या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी पक्षाचा मेळावा घेण्यासही त्यांनी अनुमती दर्शविली आहे.
या बैठकीच्या नियोजनासाठी शनिवारी (दि. ०२) रोजी आ. अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठीकास आ. अण्णा बनसोडे, मा.आ. विलास लांडे, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, कैलास थोपटे, किरण मोटे, श्रीरंग शिंदे आदी उपस्थित होते.
दरम्यान बैठकीचे ठिकाण, बैठकीत सर्व माजी नगरसेवक व इतर मान्यवरांना निमंत्रण देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. याशिवाय कार्यकारिणी जाहीर करून त्या कार्यकारिणीचा सत्कार करावा. महिलांचा देखील यात समावेश असावा. पक्षाला मानणाऱ्या लोकांनी पक्षाला व माजी नगरसेवकांना कशी ताकद द्यावी. पालिका निवडणुकीत कोणकोणत्या मुद्द्यावर जास्त भर द्यावा आणि सत्ताधा-यांना कसे घेरायचे? या विषयावर सविस्तर चर्चा पार पडली, अशी माहिती, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी दिली.














