- शिवकांता सेल्स इंडिया कंपनीच्या नावाने अनेकांना ठगले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- शिवकांता सेल्स इंडिया प्रा. लि कंपनीच्या नावाने लोकांना प्लॅन ए ‘लोन कोई भी लो, ईएमआय हम देंगे’ म्हणजे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर वस्तू घ्या त्या वस्तूचे ५० टक्के रक्कम मला द्या आणि उरलेल्या रक्कमेचे हफ्ते मी भरणार तर, प्लॅन बी ‘नो लोन नो ईएमआय’ यामध्ये कोणतीही वस्तूची ७० टक्के रक्कम मला द्या आणि ३५ दिवसानंतर त्या दुकानात जाऊन सगळे पैसे मी स्वत: भरून ती वस्तू तुम्हाला घेऊन देतो असे सांगितले.
आरोपीने फिर्यादी यांना कोणतीही वस्तू न देता २२ लाख ८५ हजार ७०० रूपयांची फसवणूक केली. याच प्रकारे आरोपीने अनेक लोकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ऑगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२१ कालावधीत स्विमिंग टँक रोड, जुनी सांगवी येथे हा प्रकार घडला.
याप्रकरणी ४९ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतिश अंकुश कांबळे (संगमनगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.