- डॉक्टरांकडून हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२१) :- कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तरुणाने १ ऑक्टोबरला करोनाची दुसरी लस घेतली होती. त्रास होऊ लागल्यामुळे तो घरीच आराम करीत होता.
आज रविवारी (दि. ३) रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास जास्तच त्रास होऊ लागल्याने तो घरीच बेशुद्ध झाला. वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
आकाश विलास कोरे (वय २५, रा. धर्मराजनगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी चिखली येथे घडली. शवविच्छेदन अहवालानुसार आकाश याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
















