- पगार न दिल्याचा राग कामगाराला अनावर; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- पिंपळे गुरव येथे सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कारखान्यत कामाला असणाऱ्या आरोपी कामगाराला कंपनीच्या मालकाने दुचाकी वापरण्यासाठी दिली होती. मालकाने आरोपी कामगाराच्या कामाचे ४० हजार रुपये दिले नव्हते. यामुळे कामगाराला राग अनावर झाला.
त्याने चिंचवड येथील लिंक रोड येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्याकडील मालकाची दुचाकी भर रस्त्यात जाळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व आग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. अंकित शिशुपाल यादव (वय २७, सध्या रा. पिंपळे गुरव, मुळगाव उत्तर प्रदेश), असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कामगाराचे नाव आहे. तो मांजरीतील गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला आहे.