- मोठ्या शिताफीने सर्पमित्रांना अजगराला पकडण्यात यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- अजगर जातीचा नऊ फुटांचा १८ किलो वजनाचा नरजातीचा इंडियन रॉक पायथन नावाचा बिनविषारी साप चिखलीतील नेवाळे वस्ती येथे रविवारी रात्री अडीचच्या सुमारास पत्र्याच्या घरात आढळला.
सर्पमित्र वैभव कुरुंद यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांना भलामोठा अजगर असल्याचे दिसून आले. त्यांनी मदतीसाठी सर्पमित्र विशाल पाचंदे, शुभम पांडे, योगेश कांजवणे, राजू कदम यांना बोलावले.
त्यानंतर मोठ्या शिताफीने अजगराला पकडण्यात आले. वनविभागाला याबाबत माहिती देऊन हा साप मुळशी तालुक्यातील घाेटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात सुरक्षितपणे सोडून देऊन जीवदान देण्यात आले. येथील शेतकरी किरण नेवाळे यांच्या पत्र्याच्या घरात हा साप दिसून आला.