- महिलेला शिवीगाळ अनं दमदाटी; पर्समधून पैसेही काढले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- महिलेच्या घरात घुसून हातामध्ये तलवार व लोखंडी कोयता घेऊन तलवारीने खिडकीची काच फोडली. तसेच दहशत निर्माण करून फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पर्समधून दोन हजार शंभर रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.
ही घटना रविवारी (दि. ३) रात्री सव्वासात वाजताच्या दरम्यान आकुर्डीतील किसन पांढारकर चाळ, पंचतारानगर येथे घडली. ३८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अविनाश उर्फ तोत्या पांढरकर, बोन्या उर्फ बोनूप्रसाद हंसराज जयस्वाल, संपत उर्फ पप्प्या महाबली जयस्वाल, अजित छोटेलाल जयस्वाल, रुपेश रायसाहेब जयस्वाल, प्रतीक महादेव वाघ, आदित्य संतोष जयस्वाल (सर्व रा. सुभाष पांढारकर चाळ, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.