- पिडीतेने पती आणि नणंदेच्या पतीला केले गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- पत्नीवर बळजबरी करून घरातील व्यक्ती शारीरिक संबंध ठेवत आहे, असा संशय आल्याने पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत घरातील बेडरूमध्ये कॅमेरा लावला.
पती नोकरीसाठी बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेऊन ३३ वर्षीय नणंदेच्या पतीने पीडित महिलेवर बळजबरी करून बलात्कार केला. ही घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली. सासरच्या व्यक्तींनी फ्लॅट घेण्यासाठी २५ लाखांची मागणी केली. शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला.
पतीने बेडरूमध्ये कॅमेरा लावल्या प्रकरणी आणि पीडित महिलेवर नणंदेच्या पतीने बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी २८ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती आणि नणंदेचा पती या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चिंचवड पोलीस करत आहेत.