- ओम हॉस्पिटलच्यावतीने हृदयरोग व मधुमेह मोफत तपासणी सप्ताहचे आयोजन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जाने) :- प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी येथील सुप्रसिध्द मल्टीस्पेशेलिटी अत्याधुनिक, अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज ओम हॉस्पिटलच्या वतीने २१ ते ३१ जानेवारी दरम्यान महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात सर्व गरजू रुग्णांची हृदयरोग व मधुमेहाची तपासणी ओम हॉस्पिटल मध्येच तज्ञ डॉक्टारांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरासोबत पुणे जिल्ह्यातील गरजूनीं या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले आहे.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले की, स्वास्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त पुणे शहर ही संकल्पना समोर ठेवून २१ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजित शिबीरात ओम हॉस्पिटलमध्ये मधुमेह आणि ई .सी. जी तपासणी करण्यात येईल आणि तज्ञाव्दारे औषधोपचाराविषयी मोफत सल्लाही देण्यात येणार आहे. मधुमेहाची तपासणीबाबत जनजागृती व्हावी ही सामाजिक बांधिलकी जपत ओम हॉस्पिटलच्यावतीने या मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. अशी माहिती ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनिल अग्रवाल यांनी दिली.












