न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जाने.) :- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष केले होते. त्यावर आज शनिवार (दि. १९) रोजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी वाघेरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आजपर्यंत २३ निवडणूका जिंकल्या आहेत.
सरपंच, आमदार, खासदार ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. वाघेरे यांनी महापौर आणि नगरसेवक एवढीच भरारी मारली असून, दानवे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर टीका करताना त्यांनी आपली पात्रता तपासावी.
आपण कोणाबद्दल बोलत आहोत, याचे आत्मपरिक्षण करावे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर याच वाघेरेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांचे छायाचित्र पायदळी तुडविले होते. आता त्यांना पवार यांचा पुळका आला आहे. असा घणाघात यावेळी पवार यांनी केला आहे.















