- दरोडा विरोधी पथकाकडून मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- बनावट २०० रुपये दराच्या ४८ खोट्या चलनी नोटा असल्याचे माहिती असतानाही स्वतःजवळ त्या बाळगल्या. त्या नोटांचा वापर व्हावा, या उद्देशाने काही बनावट चलनी नोटांचा वापर बाजारात केला. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडील बनावट नोटा जप्त केल्या. ही घटना गुरुवारी (दि. २८) सायंकाळी महात्मा फुलेनगर पिंपरी येथे उघडकीस आली.
दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई विनोद वीर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश दादू जाधव (वय ३२, रा. एमआयडीसी भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.