- तरुण गंभीर जखमी; पोलिसात तक्रार दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- पुण्याहून कासारवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाच्या गळयाला मांजा अडकून तो गंभीर जखमी झाला. मांजामुळे तरुणाच्या गळ्याला, हाताला गंभीर इजा झाली आहे. बापोडी खडकी रस्त्यावर गुरुवारी (दि. २८) ही घटना घडली.
याप्रकरणी खडकी पोलिसांना कळविण्यात आले आहे. चिन्मय वाखारे असे मांजामुळे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिन्मय गुरुवारी (दि. २८ ) दुपारी दिवाळीच्या खरेदीसाठी दुचाकीवरून पुण्यात गेला. सायंकाळी परतत असताना, खडकी स्टेशनच्या पुढे आल्यावर त्याला गळ्याला काही तरी टोचल्याचे जाणवले.
त्याने हात लावले असता, तो पतंगाचा मांजा असल्याचे जाणवले. त्याने हाताने गळ्याभोवतीचा मांजा काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या हातालाही जखम झाली. त्यानंतर चिन्मय याने वाहन बाजूला घेत त्याने अलगद तो मांजा काढला. त्याच्या बहिणीने त्याला खडकी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.