- निगडीवरून लोणावळ्याला पहिली बस सकाळी ४.५० वाजता सुटणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने निगडी आगार ते लोणावळा हा नवीन मार्ग सुरु करण्यात आला असून, या मार्गाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, पुणे पालिकेच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, पीएमपीएमचे दत्तात्रय झेंडे, संतोष माने, रमेश चव्हाण, शांताराम वाघेरे आदी उपस्थित होते.
मार्ग क्रमांक ३६८ निगडी ते – देहरोड लोणावळा ही बस निगडी तळेगाव – कामशेतमार्गे लोणावळा स्टेशन येथे जाणार असून याचमार्गे परत निगडीला येणार आहे. एकूण ९ फेऱ्या होणार असून निगडीवरून पहिली बस सकाळी ४.५० वाजता व शेवटची बसरात्री ९ .४० लोणावळ्यासाठी सुटेल. लोणावळ्यावरून पहिली बस सकाळी ६.१५ वाजता. तर शेवटची रात्री ११.१५ वाजता बस निगडीसाठी सुटेल. या मार्गावर दिवसभरात एकूण ७० खेपा होणार असून, प्रत्येक अर्धा तासाला एक बस उपलब्ध असणार आहे. मार्ग क्रमांक ३६८ निगडी ते लोणावळा या बसमुळे लोणावळा, कामशेत व मावळातील कामगारवर्ग, विद्यार्थी, पिंपरी – चिंचवडमधील प्रवाशांची सोय होणार आहे.