न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ३०) रोजी ५४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७६१६१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७१८५६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४४८९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.












