- जुनी गाडी देऊन एकाची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याचे फिर्यादीला आश्वासन दिले. त्यासाठी कागदपत्रे आणि टप्याटप्याने सव्वा लाख रुपये घेतले. रजिस्ट्रेशन न झालेली जुनी गाडी फिर्यादी यांना देऊन त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मार्च ते २९ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पिंपरीत ही घटना घडली. महेश कृष्णा हेमगुडे (वय २७, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आकाश दशरथ पवार (वय ३५, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.












