- आ. जगताप आणि भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) :- महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ मामा यांचा आज आमदार लक्ष्मण जगताप व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे व भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी संतोष कलाटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला.
त्यांच्या समवेत अक्षय मोहिते, प्रशांत मोहिते, विकी कदम, अनंत पडवळ, अजय चव्हाण, रवी मोहिते, संदीप कदम, मयूर मोडवे, विनोद पासलकर,अजय थोरात, राजू मारटकर यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी लांडेवाडी परिसरासह पिंपरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विचार जनमाणसांत पोहचविण्याची व पक्षकार्य एकनिष्ठेने करण्याची ग्वाही त्यांनी दिली.