न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २३ जाने.) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेह संमेलन शनिवार व रविवार (दि. १९ व २० जानेवारी) दरम्यान अतिशय उत्साहात पार पडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक शंकर जगताप, शारदा मुंडे, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर स्वप्ना देवतळे, स्वागता मान्ना आदी उपस्थित होते. यावेळी जगताप यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सुरेश लोंढे, शाळेचे संस्थापक संदीप काटे, उप-संस्थापक अनिता काटे, डायरेक्टर संतोष काटे, निलेश काटे, निहारा काटे, लीना काटे, पालक अतिथी योगेश रानभरे, धेर्यशील सणस डॉ. भूषण कुमार पाटील, पूजा परतणे, पूर्व प्राथमिक विभाग वाकड शाखेच्या मुख्याध्यापिका दीपिका येसूदास, पिंपळे सौदागर शाखेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, समन्वयक रजनी घुगे व पूर्व प्राथमिक विभाग समन्वयक पलक गांधी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समूह गीत, युगल गीत सादर केले. विद्यार्थ्यानी अनेक नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांच्या वाद्य वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांनी कवितेवर आधारित नाटिका सादर केली आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.















