- पत्राशेड, पत्राघरे, आरसीसी बिल्डिंग, दुकाने पाडली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- किवळे, साईनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये अनधिकृत पत्राशेड, पत्राघरे, आरसीसी बिल्डिंग, दुकाने व पत्राशेड गोडाऊन हटविण्यात आले आहे.
‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता संजय भोसले, कनिष्ठ अभियंता मनाली स्वामी, स्थापत्य अधिकारी दिनेश नेरकर व अमोल पवार यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
किवळे येथे पाच आरसीसी बांधकाम पाडण्वयात आली. एक मोबाईल टॉवर सील करण्यात आला आहे. तसेच, साईनगर येथे पाच आरसीसी व तीन पत्राशेड पाडण्यात आले. कारवाई दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भविष्यातही अवैध बांधकामावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘ ब ‘क्षेत्रीय कार्यालय प्रभाग अधिकारी सोनम देशमुख यांनी सांगितले.