न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या मार्गावर महामेट्रोने मेट्रोची मार्गिका उभारली आहे. ते काम करताना मेट्रोने शहरातील बीआरटीएचे थांबे तोडून नुकसान व दुरवस्था केली. त्यांच्या दुरुस्तीचे काम महामेट्रो स्वतः न करता त्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे.
त्यातून पालिकेच्या बीआरटीएस विभाग थांब्यांची दुरुस्ती करणार आहे. त्यानुसार रस्ते दुरुस्तीसाठी ४५ लाखांचा निधी पालिकेच्या बीआरटीएस विभागाला प्राप्त झाला आहे . त्या निधीतून बसथांबे दुरुस्त केले जाणार आहेत, असे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.
शहरातील दापोडी चिंचवडपर्यंतच्या ७.५ किलोमीटर अंतर मार्गावर मेट्रो मार्गिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो मार्गिका व स्टेशनच्या कामासाठी रस्ते , पदपथ तसेच, बीआरटीचे काही थांबे तोडण्यात आले. तसेच, अनेक ठिकाणी कठडे उखडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे बस थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, काही थांबे वापरात नाहीत.