- दुकान मालकाकडून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- भोसरीगावात मोबाईलच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी छत उचकटून प्रवेश केला. दुकानातील ९० ते ९५ मोबाईल फोन चोरून नेले. ज्याची किंमत अडीच लाखाची रुपये आहे. सॅमसंग, नोकिया, रेडमी, ओप्पो, विवो अशा मोबाईल फोनचा यात समावेश आहे.
ही घटना गुरुवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. १९) या कालावधीत रात्री साडेअकराच्या सुमारास ‘दि फोन झोन’ या मोबाईल दुकानात घडली. प्रविण हरेश सचदेव (वय ३७, रा. विजय नगर, काळेवाडी) यांनी शुक्रवारी (दि.१९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४५४, ४५७, ३८० अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.