- पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीत आणखी एक गैरप्रकार उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस भरतीसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा पार पडली. या लेखी परीक्षेत दोघे काही प्रमाणात सारखे दिसतात, याचा फायदा घेऊन लेखी परीक्षेला स्वतः उपस्थित न राहता डमी परीक्षार्थी बसविला.
बावधन येथील अरीहंत इन्स्टिट्युट या परीक्षा केंद्रावर परीक्षेचा कालावधी संपण्यास अवघे पाच मिनिटे बाकी असताना संबंधित केंद्रावर डमी परीक्षार्थी बसवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक काकडे यांना गुप्त माहितीदारामार्फत मिळाली आणि डमी परिक्षार्थ्याचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य परीक्षार्थी आणि डमी उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. मुनाफ हुसेन बेग अस डमी परीक्षार्थी तरुणाचे नाव आहे. तर, प्रकाश रामसिंग धनावत अस मुख्य परीक्षार्थी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मी डमी परीक्षार्थी नाही असं वारंवार सांगत होता. परंतु, त्याला मुख्य परिक्षार्थीच्या तीन सह्या करण्यास सांगितल्या तेव्हा त्यात तफावत आढळली आणि सत्य उजेडात आले.