- म्हणाले…फडणवीस ज्याच्या पाठीशी त्याचे कोण वाकडे करू शकत नाही !…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे सच्चा माणूस आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा अशी या माणसाची राज्यभरात ओळख आहे. या सच्च्या माणसावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विशेष जीव आहे. त्यामुळे राज्यात सत्ता नसली, तरी फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी तुफान फटाकेबाजी विधान परीषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
चिखली येथे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
पडळकर म्हणाले की, महेश लांडगे अतिशय भला माणूस आहे. ते मनाने निर्मळ आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा चांगल्या मनाच्या माणसाशी कायम एकनिष्ठ रहायला हवे. जे गोरगरीब आहेत. ज्यांची समाजात प्रतारणा होते. अशा माणसाच्या पाठीशी महेशदादा यांचे नेतृत्व कायम उभे असते. अशी त्यांची राज्यभरात ख्याती आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते फडणवीस हे खंबीर पाठिंबा देऊन उभे आहेत. हे दोघेही इतके भले आणि सच्चे आहेत म्हणून माझा या दोघांवर विशेष जीव आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात समाविष्ट असणाऱ्या उपनगर समजल्या जाणाऱ्या चिखली सारख्या भागाचा कायापालट आपल्याला गेल्या चार वर्षांत दिसून आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही कुठलेही पद देताना शहराबाहेर जाऊन निर्णय घेत नाही. असे म्हणत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना टोला लगावला. शहरातच, स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो. त्यामुळे महत्त्वाची पदे देखील त्याच ताकदीच्या माणसाला मिळतात आणि म्हणूनच शहराचा प्रभागाचा आणि स्थानिक भागांचा विकास झालेला दिसून येत आहे, असे आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले.