न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २४ जाने.) :- पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील भोसरी एमआयडीसी ‘टी ब्लॉक’ येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले.
‘टी ब्लॉक’ येथील पर्यावरण संस्कार उद्यान व आजूबाजूच्या परिसराची यावेळी स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये महापालिकेच्या उद्यान व आरोग्य विभागाचा एकही अधिकारी व कर्मचाऱ्याने सहभाग नोंदवला नाही हे विशेष. महापालिकेने गेली कित्येक वर्षे एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियान राबविले नाही. त्यामुळे जनजागृती नगण्यच होती.
फोरमच्या वतीने पुढाकार घेऊन हे अभियान राबविण्यात आले. सर्वप्रथम पर्यावरण उद्यानाची स्वच्छता करण्यात आली. या उद्यानात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व वृक्षे आहेत. तसेच यात नक्षत्रवनसुद्धा आहे. व्यक्तीच्या नक्षत्रानुसार कुठले झाड घरी लावावे याविषयीचे मार्गदर्शन व विविध प्रकारच्या पक्षांचे छायाचित्र येथे आहे. महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळांच्या सहली येथे आयोजित केल्या जातात. परंतु, उद्यानात स्वच्छता नसल्यामुळे तसेच पिण्यासाठी पाणी, बसावयास जागा व स्वच्छता या गोष्टींचा अभाव असल्यामुळे या उद्यानाकडे कोणीही फिरकत नाही.
या उद्यानात उद्योजकांना जॉगिंग पार्क तसेच औद्योगिक परिसरात कचराकुंड्या, स्वच्छता जनजगृतीसाठी फलक व मुख्यतः महिलांसाठी सुलभ शौचालयांची व्यवस्था आदी मागण्यांसंदर्भात महापालिकेकडे लवकरच मागणी करण्यात येईल, असे भोर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस. आर. वाघ, अभय भोर, उद्योजक, कामगार, कार्यकर्ते, चेतन साबळे, प्रशांत साबळे, राजेश बोरकर, दुर्गा भोर, अवंतिका भोर, गणेश विपट, सोनू ओहरी, नितीन खडके, मिलिंद ढवळसकर, राहुल भगत, मारुती बाणेवार, हनुमंत खरात, काळे , संतोष गायकवाड, मुजफ्फर इनामदार, बाळासाहेब निलजकर, अनंत कुलकर्णी, शशिकला तापकीर, नीता एलमळी, आदी उद्योजक व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांना अल्पोहार देण्यात आला व सर्वांनी स्वच्छ झालेल्या जागेमध्ये वनभोजनाचा आनंद लुटला.











