न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २४ जाने.) :- पिंपळे सौदागर येथील ह.भ.प. पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात पार पडले. उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपति शिवाजी महाराज यांच्या उदघाटन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, मास्टरमाईंड स्कुल संस्थापिका जयश्री गवळी, नारायण काटे, संचालक पवना सहकारी बँक जयनाथ काटे, पी. के. स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, सचिव सोमनाथ काटे, रोहन काटे, मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, पर्यवेक्षिका ,सविता आंबेकर, क्रीडाशिक्षक राहुल कोरे, शिंदे सयना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक , राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील आदी उपस्थित होते.
या निमित्ताने नर्सरी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. “महाराष्ट्राची लोकधारा ” व ” जीवनाचे रंग ” या विषयावर आधारित गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये मोरया- मोरया, वि लव्ह टिचर, लव्ह यू जिंदगी, रुकी रुकीसी जिंदगी,गॉड तुसी ग्रेट हो, ब्राउनी गर्ल, लिटील बटरफ्लाय, हे राजे जी जी रं ,तुम्ही हो बंधू, शाम गुलाबी, ये लाडकी है दिवाणी, रंगीला ढोलना,विठ्ठल – विठ्ठल,’पापा मेरे पापा, आय एम डिस्को डान्सर, अपना हर दिन ऐसे जिओ, इंडियावाले, चौगाडा तारा, आम्ही ठाकर-ठाकर, कोई कहे कहेता रहे, ऑल इज वेल, झुंजू मुंजु पहाट झाली, नटरंग, आली ठुमकत, मल्हार- मल्हार, आईगिरी नंदिनी, गल्लन गुडियां आदी गाण्यांवर मनमोहक नृत्य सादर केले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक देखील मोठ्या संख्येने हजर होते. शर्वाणी टाकळकर, शिल्पीश्वेता दास, मिनाक्षी अत्रे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. तर पूजा पाटील यांनी आभार मानले.















