न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज गुरुवार (दि. २४ ) रोजी मोठी कारवाई केली.
पिंपळे गुरव येथून सायंकाळी ५ वाजता कारवाईस प्रारंभ करण्यात आला. या कारवाईचे लोन काळेवाडीतील तापकीर चौक व परिसरापर्यंत पोहोचले. यावेळी हातगाडी व पथारीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीस व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत, अशी अनधिकृत अतिक्रमणे पोलिसांच्या संरक्षणात हटविण्यात आली आहेत. त्याचबरोबर विनापरवाना हातगड्याही जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे हनुमंत सरोदे यांनी दिली.











