न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- टीयुसीसी महाराष्ट्र राज्याच्या वतीने देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती एमआयडीसी भोसरी येथील कामगार नेते दादा रुपमय चटर्जी चौक येथे साजरी करण्यात आली.
टीयुसीसी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी संभाजी शिंदे, सेक्रेटरी प्रमोद मोरे, संघटक सचिव माणिकराव सस्ते यांनी नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी संभाजी शिंदे व प्रमोद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास संजय सुर्वे, नामदेवराव भोपते, बाळासाहेब तांबे, निलेश शिनलकर, दीपक गौड, गणेश लांडगे, सुनील याऊल, शैलेश वाघेरे, हरिश चक्रायत, पंकज जमले, आत्माराम खेतले, तसेच एम आय डी सी वर्कर्स युनियन व महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटनेचे सभासद बहूसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन एमआयडीसी वर्कर्स युनियन यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय सुर्वे यांनी केले.















