- सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष; एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२१) :- औंध जिल्हा रुग्णालयातील कुटुंब कल्याण इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यावेळी इमारतीच्या तिस-या मजल्यावर प्लास्टरचे काम करत असताना पहाडावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.
पांडुरंग गंगाराम राठोड (वय ३६, रा. जुनी सांगवी. मूळ रा. कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने तसेच संरक्षक जाळी लावणे गरजेचे असताना लावली नाही.
याबाबत पोलीस नाईक संतोष गवारी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयसिंग ढाकु राठोड (वय ३६, रा. घरकुल, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.















