- पालिका सभेतील प्रेक्षक गॅलरीतून कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा नारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२१) :- शहरातील वैद्यकीय सेवेचे खासगीकरण करुन ठेकेदारांची पोटं भरण्याचा उद्योग सत्ताधारी करीत आहेत. भोसरी सर्व्हे. क्र. १ येथे सुसज्ज शंभर बेडचे नविन भोसरी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाचे सर्व काम पुर्ण झाले असून हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने नागरीकांच्या सेवेसाठी ताबडतोब उपलब्ध करुन द्यावे.
तसेच नविन भोसरी रुग्णालयाबाबत यापुर्वी मनपाच्या सर्व साधारण सभेत हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी विखंडीत करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने महापौर आणि आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
शुक्रवारी (दि. २४ डिसेंबर) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असताना कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेक्षक गॅलरीत आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून नविन भोसरी रुग्णालय ‘पीपीपी’ तत्वावर देण्याबाबत मंजूर केलेला ठराव कायमस्वरुपी रद्द करा आणि वैद्यकीय सेवेत सुधारणा करा, अशा घोषणा दिल्या.















