- कनेक्शन कट केल्याचा जाब विचारत आणला सरकारी कामात अडथळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२१) :- पिंपरी विभागांतर्गत महावितरणच्या दापोडी शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २३) दापोडी येथील काटे रेसिडेन्सीमधील थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला होता. याचा जाब विचारण्यासाठी ग्राहकाने कार्यालयात येऊन काटे रेसिडेन्सीमधील घराचा वीजपुरवठा का खंडित केला असे जोरजोराने ओरडून शिवीगाळ केली.
एका महिला कर्मचाऱ्याकडून थकबाकीदारांच्या नावाची यादी व मोबाईल हिसकावून घेतला व फेकून दिला. तसेच कार्यालयातील सर्वांना दमदाटी केली. सरकारी कामात अडथळा आणला.
याप्रकरणी ललीता अनिल कुटे (वय ४५ रा. आकुर्डी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदर्श शिंदे (रा. काटे रेसीडन्सी बिल्डिंग, दापोडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी शिंदे विरुद्ध कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.


















