न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २४) रोजी ६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७८५८८ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७४४२२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२० जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.


















