न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- अखिल भारतीय जैन काॅन्फ्रेंसच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षपदी लता अशोककुमार पगारिया तर उपाध्यक्षपदी जेष्ठ समाजसेवी कांतीलाल बोथरा, कार्यकारिणी समिती सदस्यपदी भोसरी जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष व उद्योजक मदनलाल कर्नावट यांची एकमताने निवड करण्यात आली.
त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदमन छल्लानी व महिला अध्यक्षा पुष्पा गोखरू यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. ही निवड दोन वर्षासाठी आहे. सौ लता पगारिया यांचे महिला विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची निवड झाली आहे.
मदनलाल कर्नावट म्हणाले, जैन काॅन्फ्रेंसच्या योजना समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीन. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासाठी व आर्थिक मदतीसाठी मी कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
लताताई पगारिया म्हणाल्या, आत्म निर्णय महिला व युवती संघठनसाठी विशेष योजना राबवणार असून महिला स्वा-वलंबनातून कुटुंबाचा विकास हे सूत्र विकसित करणार आहे. के पी बोधरा हे पंचम झोनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आहेत.
कार्यकारणी निवडीबद्दल समाजातील विविध घटकांतून अभिनंदन केले जात आहे. भोसरी विधानसभेचे आ. महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, जय आनंद ग्रुपचे विजयकुमार मर्लेच्या, काॅन्फ्रेंस प्रमुख मार्गदर्शक डॉ. अशोककुमार पगारिया, प्राध्यापक प्रकाश कटारिया, श्री जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, माजी अध्यक्ष संजय नहार, डॉक्टर जवाहरलाल भळगट, राजेंद्र चोरडिया, सागर सांखला, सुभाष बोथरा, डॉ. प्रदीप गांधी, प्रमोद चुत्तर, प्रकाश लुंकड, अभिनेता केतन लुंकड, नगरसेवक जालिंदर शिंदे, अॅडव्होकेट बाळासाहेब थोपटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


















