- सोबत पालिकेचे प्रमाणपत्रही मिळवा; शहरवासियांना पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- नागरिकांना जुन्या, नादुरुस्त व वापर नसलेल्या सायकल दान करण्याचे आवाहन पिंपरी – चिंचवड महापालिकेने केले आहे. या जुन्या सायकली आर्थिक दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोफत भेट म्हणून दिल्या जाणार आहेत.
शहरातील बरेच जण सायकली घेतात आणि दोन तीन वर्षे वापरल्यानंतर तशाच पडून राहतात किंवा नादुरुस्त झाल्याने त्यांचा वापर करत नाहीत. अशा सायकली जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात दान करण्याचे आवाहन पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपक्रमात नागरिकांना योगदान देता येईल. सायकल दान करणारे नागरिक, सोसायटी यांना प्रमाणपत्र देऊन पालिकेच्या वतीने सन्मान देखील केला जाणार आहे. पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांत नागरिकांना सायकल जमा करता येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.