- पिंपळे गुरवमधील जगताप हत्याकांड; पोलिसांकडून आरोपी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- पिंपळे गुरवमध्ये भर चौकात गोळीबार करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकण जवळील कोये-कुरकुंडी गावात रविवारी (दि. २६) गोळीबार करण्यात आला आहे. १८ डिसेंबर रोजी योगेश रवींद्र जगताप याचा पिंपळे गुरव येथे गोळ्या घालून खून करण्यात आला होता.
सांगवी पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या मागावर पोलिसांची विविध चार पथके रवाना करण्यात आली होती. खेड तालुक्यातील चाकण जवळील कोये गावात एका शेताच्या कडेला असलेल्या घराच्या बाजुला आरोपींची काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली पल्सर गाडी पोलिसांना झाडीत दिसून आली.
आरोपींनी समोरून गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे देखील पोलिसांच्या या पथकासोबत होते. त्यांनी पळून जाणाऱ्या पोलिसांच्या दिशेने झाड फेकल्याने आरोपी खाली पडले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गणेश हनुमंत मोटे (वय २३, रा. सांगवी), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २३, रा. सांगवी) आणि महेश तुकाराम माने (वय २३, रा. कवडेनगर, सांगवी) या तिघांना अटक केली आहे. आरोपींनी केलेल्या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नसून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.