न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना सहशहर अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे, तसे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी पारित केले आहेत.
पाणीपुरवठा विभागासंदर्भात तक्रारी वाढल्याने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रामदास तांबे यांना जलनिस्सारण विभागाची जबाबदारी देत कार्यकारी अभियंता लडकत यांना पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली.
मात्र, स्मार्ट सिटीच्या स्थापत्य विभागाचे महाव्यवस्थापक अशोक भालकर हे सहशहर अभियंता असल्याने लडकत यांनी पदोन्नती नाकारण्यात आली होती. लडकत पुढील दोन महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत. नियमानुसार त्यांना पदोन्नती देण्यास सर्वसाधारण सभेने शिफारस केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी त्यांना पदोन्नती दिली आहे.