न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून ” अ ” क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १५ निगडी, सेक्टर नं. २६ येथील भक्ती शक्ति चौक निगडी ते रावेत नविन पुलाकडे जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या मोकळ्या भुखंडाच्या ठिकाणी बी. आर. टी रस्त्यालगत अनधिकृत पत्राशेडवर सोमवारी (दि. २७) निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये एकूण २५ अनधिकृत पत्राशेड असे एकुण क्षेत्रफळ अंदाजे १५३०० चौ. फुट पाडण्यात आले. ४ टप-या, ३ हातगाड्यावर कारवाई करून नेहरूनगर येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आल्या.
ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी श्रीमती शीतल वाकडे, सहशहर अभियंता (अतिक्रमण विभाग) सतीश इंगळे, सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग) मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संजय भोसले, उप अभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता रमेश जिंतीकर, अतिक्रमण प्रमुख जयंत मरळीकर, बीट निरीक्षक साहेबराव पवार, इमान पठाण, अमित पवार आणि सुपरवायझर ०३ (अ क्षेत्रीय कार्यालय) यांच्या अधिपत्याखाली महानगरपालिका अतिक्रमण पथक, पोलीस निरीक्षक ०१, पोलीस उपनिरीक्षक ०३, पोलीस पुरुष १०, पोलीस महिला ०५, अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयातील महाराष्ट्र सुरक्षा बल पथक कर्मचारी ३०, मजूर ०८, जेसीबी ०३, क्रेन ०२ च्या सहाय्याने करण्यात आली.