न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने आज मंगळवारी (दि. ४) रोजी प्र. क्र. १७ वाल्हेकरवाडी येथे बांधकामांवर कारवाई केली. १ पत्राशेड, ८ आर.सी.सी. अशा अंदाजे १५९३३.०० चौ. फु. अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई केली.
या कारवाईत १ जेसीबी, १ पोकलेन, २ ट्रक्टर ब्रेकर, १० मजूर, आणि मनपाचे १२ पोलीस कर्मचारी अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे ३० कर्मचारी, चिंचवड पोलीस स्टेशनचे २७ कर्मचारी आणि ५ अधिकारी यांच्या सहकार्याने केली.
ही कारवाई कार्यकारी अभियंता संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअभियंता दिपक करपे, कनिष्ठ अभियंता प्रविण धुमाळ व मनाली स्वामी यांच्यासह ७ बीट ऑफिसर, २ सुपरवायाजर, १० मनपा कर्मचारी यांच्या पथकाने केली.