- शहरात आज ३५० कोरोनाबाधित; एकही मृत्यू नाही; २९ रुग्ण मुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ४) रोजी ३५० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७९९२२ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७५३२२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.
दरम्यान आज एक ६१ वर्षीय पुरुष ओमायक्राँन बाधित आढळून आलेला आहे. हा रूग्ण रँन्डम तपासणीमध्ये ओमायक्राँन पाँझीटिव्ह आढळून आलेला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असुन त्यास रुग्णालयात दाखल करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. एकूण ७१ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ५५ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.