- अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- भोसरी येथे एम आर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाचे मोबाईलचे शोरूम आहे. सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास शोरूम कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला.
शोरूममधून तब्बल ५५ लाख १२ हजार ६४२ रुपये किमतीचे २२२ मोबाईल फोन चोरून नेले. फिर्यादी मंगळवारी (दि. ४) सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला.
प्रभू रतनलाल भाटी (वय ३२, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी या भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.