- दोन पिस्टलसह जिवंत काडतुसे व इतर मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील कृष्णाई पेट्रोल पंपावर सोमवारी (दि. ३) रात्री पावणे अकराच्या दरम्यान आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ पेट्रोल पंप परिसरात सापळा रचून तिघांना अटक केले.
आरोपींकडून एक दुचाकी, दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड व नायलॉन दोरी असा एकूण १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचे दोन साथीदार पळून गेले. पोलीस नाईक सागर शेडगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आकाश अनिल मिसाळ (वय २१ रा. इंद्रायणी नगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. सुतारवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह करण, सनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.