न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- औंध रावेत बीआरटी मार्ग रस्ता सुस्थितीत असतानाही येथे नागरिकांच्या करातील शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांसमवेत या मार्गाचा पाहणी दौरा केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कलाटे यांनी आरोप केला होता. याबाबत पालिकेच्या बीआरटीएस विभागाने पत्रक काढून खुलास केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सांगवी-किवळे ४५ व ३० मी. रूंदीचा बीआरटीएस रस्ता विकास आराखड्याप्रमाणे विकसित करताना सात पॅकेजेमध्ये सन. २००७ साली निविदा काढून केलेले आहे. जगताप डेअरी ते किवळे मुकाई चौक रस्त्यांची विकसनाची / डांबरीकरण करण्याची कामे २०१२ साली पूर्ण झालेली आहे. डांबरी रस्त्याचा दोष दायीत्व कालावधी ३ वर्षे इतका असुन सुमारे ९ ते १० वर्षे इतका कालावधी काम पूर्ण होऊन झाला आहे व तेव्हापासून या रस्त्यावर पदपथ सेवा रस्त्यांमधून विविध सेवा वाहिन्यांच्या केबल्स, गॅस पाईपलाईन, पाण्याच्या लाईन्स, ड्रेनेज वाहिन्या, डिफेन्स विभागाची केबल, महाजनको महापारेषणची केबल्स इत्यादीमुळे सेवा रस्ता व पदपथाची अनेकदा खोदाई केल्यामुळे नादुरुस्त/खराब झालेला आहे. तसेच या रस्त्यावरील जगताप डेअरी साई चौक ते डांगे चौक यादरम्यान तीन उड्डाणपूल व तीन सबवे च्या बांधकामांमुळे सेवा रस्ता व पदपथ पूर्णतः खराब झालेला आहे.
हा भाग दाट लोक वस्तीचा भाग असून खराब झालेले सेवा रस्ते व पदपथांची कामे करणे आवश्यक आहे. सांगवी किवळे रस्त्याच्या डांबरीकरणाचा वरचा थर खराब झाला असून अनेक ठिकाणी त्याची रायडींग क्वालिटी खराब झाली आहे. त्याची roughness test केलेली आहे व चाचणीनुसार या रस्त्याच्या roughness index आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे त्याचे सध्यस्थितीत डांबरीकरण करणे आवश्यक आहे. सांगवी किवळे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन सुमारे दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे. डांबरीकरण कामाचा दोष दायित्व कालावधी तीन वर्ष पूर्ण होऊन त्यावर सहा ते सात वर्ष झालेली आहेत. त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी नादुरुस्त खराब झालेला आहे. मा. आयुक्त सो यांनी मा. शहर अभियंता, सह शहर अभियंता (BRTS) व इतर अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. त्यानुसार या रस्त्यांच्या पदपथ बांधणी व डांबरीकरण करणे या कामाच्या निविदा मनपाने प्रसिद्ध केलेल्या आहेत व कार्यवाही चालू आहे.















