- पिंपळे सौदागरमधील घटना; आरोपीला बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड, पुणे व जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्या आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो पिंपळे सौदागर येथे वावरत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपी फिर्यादी पोलीस नाईक यांना धक्का मारून निघून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याला अटकाव केला असता आरोपीने कोयत्याचा धाक दाखवला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ३०) पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस नाईक श्याम रमणलाल साळुंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सलीम पापा शेख (वय ३६, रा. पिंपळे सौदागर), असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.


















