- वाकडमधील प्रकार; अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- लेबर ठेकेदार हे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराजवळील चंद्रमाऊली गार्डनच्या गेटच्या बाजूला लक्ष्मी बासुंदी चहा अॅण्ड स्नॅक्स सेंटर येथे चहा पिण्यासाठी गेले. चहा घेतल्यानंतर बिल देताना फिर्यादीच्या हातातील १० रुपयांची नोट जमिनीवर पडली.
फिर्यादी ती नोट जमिनीवरून उचलत असताना फिर्यादीच्या पाठीमागून दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चाेरून नेला.
रविवारी (दि. ३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. राम बन्सी सगणे (वय ४२, रा. मुंजोबानगर, काळाखडक जवळ, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















