- दोघांना लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- संभाजीनगरमध्ये प्लायवूडचे दुकान शनिवारी (दि. २९) रात्री साडे आठच्या सुमारास बंद करीत असताना आरोपी लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन तेथे आले. काहीही कारण नसताना दहशत निर्माण करून शिवीगाळ करीत दुकानाच्या गल्ल्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्यादीसह त्यांचे सहकारी यांनी प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. या आरोपींवर दरोड्याचा प्रयत्न केल्याचा तसेच मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रामसिंग देवीसिंग राठोड (रा. चिखली रोड, संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य अनिल पोटभरे (रा. अजंठानगर, पत्राशेड, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानुसार सौरभ वाघमारे (रा. घरकुल, चिखली), करण जालिदर थोरात (रा. अजंठानगर, समता बिल्डिंग, चिंचवड), मोनू ऊर्फ मोन्या शशिकांत लोंढे (रा. पत्राशेड, अजंठानगर, चिंचवड), हर्षल लहू आल्हाट (रा. यशोदा हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड), रोहन राघू पोटभरे (रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.