- आज ९३१ कोरोना तर, ४ ओमायक्रोनबाधित; चार जणांचा मृत्यू; २९४२ कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ३१) रोजी ९३१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २९४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३४७९१७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३२६६२२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५६७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०४ एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्रोनचे ४ नवीन रुग्ण आढळले असून १ महिला व ३ पुरुष आहे. १ रुग्ण मालदिव, १ कॅनडा येथुन आलेला असुन २ रुग्ण संपर्कातील आहेत. या रुग्णाची १० व्या दिवशी पुन्हा तपासणी केली असता त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. एकूण १११ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १०९ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.