- मित्र पक्षासह सत्ताधारी भाजपच्या बड्या नगरसेवकांना ‘पळता भुई थोडी’..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी (दि. ०१) सकाळी दहा वाजता जाहीर झाला. १३९ प्रभागात २२ प्रभाग अनुसूचित जातीसाठी आणि ३ प्रभाग अनुसूचित जमातींसाठी आणि ११४ जागा खुल्या गटांसाठी असणार आहे. तीन सदस्यांत सर्वांत मोठा प्रभाग तळवडे असेल, तर चार सदस्यांत सर्वांत मोठा प्रभाग हा सांगवी असणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीत होणार होती. मात्र, आराखड्यासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. तो आराखडा तयार करण्यात आला. २०२२ मधील महापालिका निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार असून, त्यात ४६ प्रभाग आहेत. महापालिकेतील त्यातील ४५ प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या खुणा निश्चित केल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांमध्ये २२ सदस्य आहेत. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ आहेत. अनुसूचित जातींसाठी २९, १९, २०, २२, ४३, ११, ३७ १८, २९, ३४, १६, ३५, १७, ४४, ३९, ३२, ४६, ४१, १४, २५, ३८, ३३ हे प्रभाग राखीव असणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी तीन टक्के आरक्षण आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४९, ५ आणि ६ हे आरक्षित आहेत.
दरम्यान २०१७ च्या निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यावेळी भाजपाने अपेक्षित प्रभाग रचना करून घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली होती. यावेळी राष्ट्रवादीने आपल्या सोयीप्रमाणे प्रभागरचना करून घेतल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील पॅनेल प्रमुख म्हणून समजल्या जाणाऱ्या नेत्यांना वॉर्ड सेफ झाले आहेत.
त्यात आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आझम पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, मंगला कदम, योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अपर्णा डोके, अतुल शितोळे, हनुमंत गावडे, मयूर कलाटे, सुमन पवळे, डब्बू आसवाणी, राहुल भोसले, मोरेश्वर भोंडवे यांचे प्रभाग सेफ झाले आहेत.
महापालिकेत नऊ नगरसेवक असणाऱ्या शिवसेनेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख सचिन भोसले, अमित गावडे, रेखा दर्शिले, मीनल यादव, सुलभा उबाळे, माजी खासदार गजानन बाबर, मोशीतील धनंजय आल्हाट यांचा प्रभाग सेफ केला आहे. नगरसेविका अश्विनी चिचवडे यांचा भाग तोडला आहे. भाजपातून राष्ट्रवादीच्या वाटेवर असणारे रवी लांडगे, संजय नेवाळे, राजू लोखंडे, माया बारणे यांचा प्रभागही सेफ केला आहे.
भाजपच्या विद्यमानांना दणका दिला आहे. त्यात सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळवे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सीमा सावळे, विनायक गायकवाड, आशा शेंडगे यांचाही भाग तोडला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे सुतावाच केल्याने प्रभाग रचनेत काँग्रेसची गोची केली आहे. शहराध्यक्ष कैलास कदम, सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट यांचा जुना प्रभाग तोडला आहे. काँग्रेसची ताकद असलेल्या भागाचीही मोडतोड करण्यात आली आहे.
अशी आहे प्रारूप प्रभाग रचना…
प्रभाग क्रमांक 1 – तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर,
प्रभाग क्रमांक 2 – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी
प्रभाग क्रमांक 3 – बो-हाडेवाडी, जाधववाडी
प्रभाग क्रमांक 4 – मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी
प्रभाग क्रमांक 5 – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी
प्रभाग क्रमांक 6 – दिघी, गणेशनगर, बोपखेल
प्रभाग क्रमांक 7 – सँण्डविक कॉलनी, रामनगर
प्रभाग क्रमांक 8 – भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग
प्रभाग क्रमांक 9 – धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत
प्रभाग क्रमांक 10 – इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती
प्रभाग क्रमांक 11 – गवळीमाथा, बालाजीनगर
प्रभाग क्रमांक 12 – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती
प्रभाग क्रमांक 13 – मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती
प्रभाग क्रमांक 14 – यमुनानगर, फुलेनगर
प्रभाग क्रमांक 15 – संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर
प्रभाग क्रमांक 16 – नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर
प्रभाग क्रमांक 17 – वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक 18 – मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी
प्रभाग क्रमांक 19 – चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर
प्रभाग क्रमांक 20 – काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर
प्रभाग क्रमांक 21 – आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी
प्रभाग क्रमांक 22 – ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर
प्रभाग क्रमांक 23 – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत
प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत
प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती
प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर
प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह
प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर
प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल
प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर
प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर
प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर
प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर
प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी
प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर
प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल
प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक
प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती
प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर
प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम
प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती
प्रभाग क्रमांक 42 – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर
प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर
प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क
प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर
प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर