न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- कासारवाडी येथील प्रभाग क्रमांक ३० मध्ये महापालिकेच्या ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण ४,२५० चौरस फूट क्षेत्रफळ जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, ह प्रभाग पथकाने केली.
कासारवाडी येथील रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस शंकरवाडीकडे जाणाऱ्या दिशेला असणारे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले.
या कारवाई दरम्यान सह शहर अभियंता मकरंद निकम, ह क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, उपअभियंता विजय भोजने, उपअभियंता बांधकाम परवानगी अतिक्रमण विभाग राजेंद्र डुंबरे, कनिष्ठ अभियंता वंदना मोरे, स्थापत्य अभियंता अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते. ही कारवाई २ जेसीबी, १ डम्पर, १ क्रेन, १ गॅस कटर तसेच १० मजूर, ६ मनपा अधिकारी, १० स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्यानि करण्यात आली.