- सत्ताधारी भाजपला लाचखोरीचे ग्रहण; दुसरा पदाधिकारी निघाला लाचखोर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- लाच प्रकरणी पिंपरी – चिंचवडचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना अटक झाल्यीच माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पडद्यामागील सूत्रधार देखील बड़ा राजकीय पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.
लाच प्रकरणी कपड़ा मार्केटमधील तीन लोकांनी फिर्याद दिली आहे. तक्रार अर्जावरून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीतून घोळवे यांना अटक केल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.
नेपाळी मार्केट, डेक्कन होंडा शोरूमच्या समोर पिंपरी येथे २०१९ ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अली शेख (वय ४५, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांची नेपाळी मार्केट येथील जागा मेट्रो प्रकल्पाला जात असल्याने त्यांना महापालिकेकडून पर्यायी जागा एकूण १०० गाळे देण्यात येणार आहेत. ही जागा फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून मिळवून देतो, असे आश्वासन आरोपींनी दिले. तसेच भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून फिर्यादी व इतर व्यापार यांची फसवणूक केली.